New Born Baby Care In Marathi असे म्हणतात पहिल्यांदाच आई होण्याचा प्रवास व बाळाची काळजी घेणे कोणत्याही नव्या आईला सोपे नसते. बाळाच्या संदर्भात अनेक प्रकारचे प्रश्न प्रत्येक आईच्या मनात असतात. बेबी बरोबरच आईचा ही नवीन जन्म होत असतो.
घरी पहिल्या बाळाच्या जन्माने प्रत्येक पालकांना खूप आनंद होतो. त्यांच्या आनंदाचे वर्णन करणे खुप अवघड असते . विशेषत: पहिल्यांदा आई झालेल्या बाईचा मुलासह नवीन जन्म होतो. पण आता आई झाल्यामुळे नवजात बाळाची काळजी करण्याची जबाबदारीही तिच्यावर वाढत असते आणि त्यासोबतच काळजीही वाढते. बाळासोबतचा प्रवास कसा असेल, आपण बाळाची योग्य काळजी घेऊ शकेन का, भुकेची लक्षणे कशी ओळखू , असे अनेक प्रकारचे प्रश्न त्यांच्या मनात येत असतात.
बाळ येण्यापूर्वीच त्याचे खेळणी, कपड़े ,अशा अनेक गोष्टींची तयारी सुरू होते. जेव्हा गर्भात मूल असते, त्याच वेळी स्त्री व्यवस्थित खाणे-पिणे चालू करते जेणेकरून नंतर तिच्या होणाऱ्या मुलाला कोणतीही समस्या येऊ नये.आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही टिप्स घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या नवजात बाळाची काळजी व्यवस्थित घेऊ शकाल.
घरच्यांची जबाबदारी
जन्मानंतर पहिल्या तासात बाळाचा आणि त्याच्या आईचा त्वचेचा संपर्क आवश्यक असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळासोबत राहण्यास डॉक्टरांना सांगणे महत्त्वाचे आहे. बाळाची काळजी घेण्याची जबाबदारी एकट्या आईची नसुन वडिलांची देखील आहे. नवीन पालकांना देखील परिवाराच्या समर्थनाची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पगारी आया परवडत नसेल, तर तुम्हाला बाळाच्या आजी-आजोबा किंवा इतर नातेवाईकांची मदत घेणे आवश्यक आहे. जेव्हा प्रसूती झाल्या नंतर आई आणि मूल हॉस्पिटलमध्ये असते, तेव्हाच काही महत्त्वाच्या मूलभूत गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे. ‘New Born Baby Care In Marathi’
डिलीवरी नंतर काय करावे
बाळंतपणा नंतर पहिल्या ४८ तासांत बाळं का रडते ,बाळाला व्यवस्थित कसे धरायचे तसेच तुम्ही स्तनपान करताना बाळाला तुमच्या स्तनाला कसे जोडावे हे हॉस्पिटलमधील परिचारिका तुम्हाला सांगू शकतात. तसेच बाळाच्या जन्मानंतर वडिलांनी लगेचच बालरोगतज्ञांना भेटणे देखील गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण सल्ला भेटेल।
बाळाच्या मेंदूचा विकास
आईने आपल्या नवजात बाळाशी बोलावे. ही गोष्ट कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल पण बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी खुप महत्वाची आहे याचा फायदा तुमचे बाळ सहा महिन्याचे झाल्यानंतर दिसून येईल
बाळाचे डायपर कसे असावे
नवजात बाळाला सुरुवातीला ३० दिवस तरी फक्त सूती किंवा कॉटन चे कापड लंगोट म्हणून वापरावे पण आजकाल हे सर्वच आईंना शक्य होत नाही त्यामुळे चांगल्या प्रकारचा डायपर वापरणे महत्वाचे आहे.चांगल्या प्रतीचे डायपर बाळाच्या साइज नुसार घ्यावे त्यामुळे बाळाला पोटाची समस्या जाणवणार नाही.
नवजात बाळाचे डायपर सतत तपासणे व बदलणे ही सर्वात मोठी समस्या असते. जेव्हा बाळ जास्त काळ घानेरडया डायपरमध्ये राहते तेव्हा जंतु संसर्ग व ऍलर्जी होण्याची शक्यता वाढते. अशावेळी तुमच्या बाळाचे डायपर वेळोवेळी तपासत रहा.
आईच्या दूधाविषयी
आईच्या दुधाला अमृत ही उपमा दिली आहे त्यामुळे किमान सहा महीने तरी बाळाला स्तनपान करावे. जर आईला दूध येत नसेल किंवा आई नोकरदार असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला बाटलीने दूध पाजत जा असाल तर ते स्वच्छ ठेवा. बाटल्या आणि स्तनाग्र नियमित स्वच्छ करा. घाणेरड्या बाटलीने मुलाला खायला देणे म्हणजे आजाराला आमंत्रण देणे. बाळाला फीडिंग बाटली स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी वापरण्याची खात्री करा.
बाळाच्या नाभीसंबधी घ्यावयाची काळजी
प्रसूतीनंतर जेव्हा बाळाची नाळ कापून त्याला आईपासून वेगळे केले जाते, त्यावेळी नाभिच्या दोरीचा एक लहानसा भाग, ज्याला स्टंप असे म्हणतात, तो बाळाच्या नाभी जवळ राहतो. बाळाच्या जन्माच्यानंतर( ५ ते १५) दिवसांच्या कालावधीत हा भाग सुकून पडतो. तो भाग सुकून पडेपर्यंत काळजी घेणे खुप महत्वाचे आहे . बाळाची काळजी न घेतल्यास बाळाला संसर्ग होण्याचा धोका होऊ शकतो . स्टंपच्या भोवतालची जागा ही पाण्याने संपूर्णपणे धुवा आणि त्यानंतर ती स्वच्छ कॉटन किंवा सूती कापडाने पुसून घ्या. बाळाचे डायपर किंवा लंगोट हे स्टंपच्या खाली ठेवा आणि स्टंपचा भाग हा उघडा सोडा. हा भाग नेहमी कोरडा ठेवा. जर तुम्हाला त्यामध्ये काही असामान्य असे बदल दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांना संपर्क करा.
Baby Care
नवजात बाळाला असे धरावे
नवजात बाळाला व्यवस्थितरित्या धरून ठेवणे हे खुप महत्वाचे असते कारण बाळाचे शरीर हे अतिशय नाजूक असते थोड्या निष्काळजी पणामुळे बाळाला खूप त्रास होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, बाळाला आपल्या हातांमध्ये खुप काळजीने उचलणे हे आवश्यक असते. त्यासाठी बाळाच्या डोक्यावर व मानेखाली हात ठेवून आधार द्यावा व अलगद खुशित घ्यावे, बाळाला हवेत फेकणे टाळले पाहिजे तसेच जोमाने हलवू नका.कारण बाळाचे शरीर खुप नाजुक असते असे केल्याने त्याला गंभीर समस्या उद्भवू शकतात.
बाळाची मालिश अशी करावी
बाळाची मालिश करण्याची परंपरा आपल्या देशात शतकानु वर्षे चालू आहे. बाळाच्या मसाज संबंधित अनेक संशोधन देखील झाले आहे, मसाजमुळे बाळाचा ताण कमी होण्यास खुप मदत होते new born baby Care In Marathi. तसेच, मसाजमुळे मुलाचे वजन वाढण्यास, दूध पचवण्यास आणि मानसिक विकासात खुप मदत होते . त्यासाठी तुम्ही बेबी मसाज तंत्राचा वापर करू शकता . बाळाला मसाज करण्यासाठी तीळचे तेल, खोबरेल तेल किंवा इतर बेबी तेल डॉक्टरच्या सल्ल्याने वापरता येते.
ढेकर काढणे
New Born Baby
बाळाला आहार किंवा दुध दिल्यानंतर नीट ढेकर काढले नाही तर त्याला गॅसची किंवा पोटात दुखण्याची समस्या येऊ शकते . जर नीट बरपिंग केले नाही तर बाळाच्या तोंडातून दूधही बाहेर येऊ शकते. या कारणामुळे बाळाला योग्यरित्या बरपिंग करणे आवश्यक आहे. यासाठी,बाळाची पाठ तुमच्या दिशेने ठेवून त्याला तुमच्या गुडघ्यावर नीट बसवा व त्याचे डोके समोरून धरा. यादरम्यान त्याची कंबर थोडीशी पुढे वाकवून त्याच्या पाठीवर व्यवस्थित थाप द्या. या स्थितीमुळे त्याच्या पोटावर दाब पडेल आणि ते ढेकर देईल. याशिवाय बाळाला छातीला लावून पोटावर व पाटीवर हळूवार रगडून तसेच मांडीवर झोपवूनही ढेकर काढता येते.
जर आपणास वरील माहिती आवडल्यास नक्की शेयर करा व कमेंट करायला विसरु नका “New Born Baby Care In Marathi”