उलट्या

गरोदरपणा आणि कोरड्या उलट्या

तुम्ही आई होता हा क्षण सगळ्यांसाठीच खूप चांगला असतो आणि आनंदाचा असतो. नवीन बाळ जन्माला घालणं ही काही साधी आणि सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खूप काही त्रास सहन करावा लागतो. जसे की उलट्या, चक्कर येणं, मळमळने असं बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सहन कराव्या लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरोदरपणात होणाऱ्या कोरड्या उलट्या. हे तर सगळ्यांनाच होतं. हा त्रास सुरू झाला की काही खावसं वाटत नाही किंवा प्यावसं सुद्धा वाटत नाही. जर तुम्हाला सारख्या सारख्या उलट्या होत असतील. आणि काहीच खावस वाटत नसेल तर त्यासाठी काही घरगुती उपाय आहेत 

सकाळी उठल्या उठल्या होणारा त्रास हा किमान पहिले तीन ते सहा महिने होतो. ज्याला मॉर्निंग सिकनेस असं म्हणतात.

तर अशा खूप सार्‍या महिला आहेत ज्यांना फक्त मळमळच नाही तर कोरडा उलटा सुद्धा होतात. तर बऱ्याचशाच महिलांना साध्या पदार्थाचा वास सुद्धा सहन होत नाही, त्यांना लगेच उलटयाचा त्रास सुरू होतो.  सामान्यतः पहिले तीन महिने हे खूप त्रासदायक असतात. कारण हा मध्ये उलटीचे प्रमाण जास्त असतं  त्यामुळे शरीरातील पाण्याची क्षमता ही कमी होते.

How to Avoid pregnancy vomiting

विश्रांतीची गरज

  पहिल्यांदा गरोदर राहिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे विश्रांती. कारण पोटात एक जीव वाढवणं ही काही साधी बाब नाही. कारण गरोदरपणात बरेच आपल्या हार्मोन्स बदलत असतात. हार्मोन्सच्या बदलामुळे होणारा त्रास म्हणजेच उलट्या आणि मळमळ. हे कारण सहसा कोणाला माहिती नसते. गरोदर स्त्रीला किमान आठ तासाची झोप पाहिजे. झोप पूर्ण करणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. घरातील काम संपवून विश्रांती घ्यायला पाहिजे. कारण झोप पूर्ण झाली तर यामुळे उलट्या आणि मळमळ चा त्रास सुद्धा कमी होण्यास मदत होईल.

जेवढा जास्त उलटी कराल त्यामुळे शरीरातील पाणी अगदीच कमी होते हे आपण आधीच बघितले आहे. त्यामुळे गरोदर स्त्रीला डिहायड्रेशनचा धोका जाणवतो. हे बाळाच्या आणि आईच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे शरीरात पाण्याची पातळी योग्य ठेवून आपला आहार तसेच नाश्त्याच्या वेळा पाळला पाहिजे. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही नारळाचे पाणी सूप्स तसेच काही फळ, लिंबाचा सरबत असे पदार्थ घेणे तुमच्या आहारात असणे महत्त्वाचे आहे. तुमचे डॉक्टर तुम्हाला असेही सांगतील की तुम्ही ओव्याचा (अजवाईन) रस पिऊ शकता.preganancy vomating  ज्यामुळे तुमचा शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत होईल.

लिंबाचा सुगंध

काही लोकांना लिंबाचा सुगंध हा खूप आवडतो. तर हा सर्वात सोपा घरगुती इलाज आहे. जर तुम्हाला जेवण करताना किंवा जेवणाच्या वासाने मळमळत असेल तर तुम्ही लगेच लिंबाचा वास घेणे गरजेचे आहे यामुळे तुमचं तसेच उलटी होणं हे थांबेल. तसेच तुम्ही आल्याचा आणि लिंबाचा रस एकत्र करून पिऊ शकता यामुळे तुम्हाला मळमळ किंवा उलटी होणार नाही. हे जास्त खूप पिऊ नका डॉक्टर सांगतात की हे तेवढेच घातक आहे.

How to Avoid pregnancy vomiting

सकाळी नाश्ता करायला पाहिजे-

गरोदर महिलांनी सतत काही ना काही खायला हवे. कारण जर पोटात काही अन्न नसेल तर यामुळे सुद्धा खूप जास्त मळमळतं किंवा उलट्या होतात. सकाळी उठल्या उठल्या मळमळणं यासाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजेच तुम्ही उठल्या उठल्या नाश्ता करायला हवे. सकाळी उठल्यानंतर हलका नाष्टा घ्यायला हवा ज्यामध्ये बिस्किट्स सँडविच अथवा पोहे उपीट  असावे. तेलकट नाष्टा टाळावा. पण नाश्ता करणे हा यावरचा अत्यंत चांगला आणि घरगुती उपाय आहे.

सतत खात राहावे

गरोदरपणात हलका हर तसेच सतत खाणे जास्त फायद्याचे आहे. कारण तुमचे जेवढे पोट रिकामे राहणार तेवढा तुम्हाला त्रास होणार. गरोदरपणात तेलकट आणि मसाल्यांचे पदार्थ खाऊ नये. छान पहिले तीन ते चार महिने हे पदार्थ टाळा. अत्यंत चांगला आणि पौष्टिक  ‘How to Avoid pregnancy vomiting’ आहार घेणं हे खूप गरजेचे आहे. गरोदरपणात नक्की काय खावे आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण डॉक्टरां पेक्षा चांगलं कोणीच सांगू शकत नाही.

हे पण वाचाबाळाची मालिश

मॉर्निंग सिकनेसची लक्षणे

बऱ्याच महिलांना गर्भधारणाच्या वेळेस मळमळ आणि उलटांचा त्रास जाणवतो तर याची काही लक्षणे एवढी त्रिव्र असतात की आरोग्य आणि खाण्यापण्याच्या सवयी यावर अवलंबून असते. काही सर्वसामान्य लक्षणे अशी आहेत जे खालील प्रमाणे –

  1. मळमळणे
  2. भूक कमी लागणे
  3. काही पदार्थ खावेसे न वाटणे
  4. अशक्तपणा येणे
  5. कंटाळा येणे
  6. पहाटेची तीव्र झोप लागणे.

हि अशी काही लक्षण आहेत जी प्रत्येक गर्भवती स्त्रीला जाणवतात. की सकाळी उठल्या उठल्या हा त्रास जाणवतो. तसेच बऱ्याच महिलांना जडपणा येतो सकाळी पाय दुखणे पोटात दुखणे, डोकं जड होणे ही सुद्धा  लक्षणे आहेत. जी खूप सामान्य आहेत. आणि ह्या सगळ्या त्रासांना मॉर्निंग सिकनेस असं म्हणतात. कारण ही सगळी लक्षणे सकाळी उठल्या उठल्या जाणवतात.

 Avoid pregnancy vomiting

डॉक्टरांना कधी भेटावे ?

गरोदरपण ही खरंच सोपी गोष्ट नाही. कारण ह्यात होणारा त्रास हा न सांगना पलीकडे असतो. गरोदरपणात मळमळ न किंवा उलटा होणं हे तर सामान्य आहे. आपले पूर्वक सांगतात की असा काही त्रास झाला की लगेच डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही. मात्र जर खूपच जास्त प्रमाणात त्रास होत असेल तर डॉक्टरांना त्वरित भेटणं खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला तसेच औषध घेणे ही तितकच महत्त्वाचा आहे.. तसेच कोणत्याही औषध डॉक्टरांना विचारून घ्या. त्याच्या मनाने कोणतेही औषध घेऊ नये. तुमच्या पोटात एक जीव वाढत आहे हे लक्षात असू दे, डॉक्टरांच्या किंवा तज्ञांच्या सल्ला घेऊनच औषधे घ्यावेत.“How to Avoid pregnancy vomiting”

वरील माहिती आवडल्यास नक्की शेयर आणि like करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *